Anirudha Sankpal
पृष्ठभागच नाही
गुरु ग्रहावर (Jupiter) कठीण अशी जमीन नसल्यामुळे तिथे उतरणे अशक्य आहे, त्यामुळं या ग्रहावर उतरताना तुम्ही खाली खाली जात आहात असा भास होतो
भीमकाय ग्रह
हा ग्रह इतका मोठा आहे की यात १३,३०० पृथ्वी समाविष्ट होऊ शकतात आणि सर्व ग्रह एकत्र केले तरी हा त्यांच्यापेक्षा अडीच पटीने भारी आहे.
लिक्विड मेटलचा समुद्र
गुरु ग्रहावर पाण्याचा नाही तर तब्बल ५५,००० किलोमीटर खोल 'लिक्विड मेटल'चा महासागर आहे.
घातक वातावरण
तिथे पोहोचण्याआधीच तीव्र रेडिएशन आणि ताशी ६०० किलोमीटर वेगाचे वादळ माणसाचा अंत करू शकतात.
गुरूला अनेक चंद्र
गुरु ग्रहाला अनेक चंद्र आहेत, ज्यांपैकी एकावर अतिशय सक्रिय ज्वालामुखी तर दुसऱ्यावर पृथ्वीपेक्षा जास्त बर्फाच्छादित पाणी आहे.
पृथ्वीचा रक्षक
१९९४ मध्ये गुरू एका मोठ्या धुमकेतूला आपल्यात ओढून पृथ्वीचे रक्षण केले होते, गुरू ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती अंतराळातील खडक आणि धुमकेतू स्वतःकडे खेचते.
ग्रेट रेड स्पॉट
येथील प्रसिद्ध 'ग्रेट रेड स्पॉट' हे महाकाय वादळ गेल्या १५० वर्षांपासून सुरू आहे आणि आता ते हळूहळू आकुंचन पावत आहे.
सूर्यावरील प्रभाव
गुरु ग्रह इतका वजनदार आहे की तो सूर्याभोवती फिरताना सूर्यालाही किंचित हलवतो आणि ८० पट मोठा असता तर हा ग्रह नसून एक तारा बनला असता.