तमन्ना भाटिया तिच्या ग्लोइंग त्वचेसाठी ओळखली जाते. आता तिने स्वतःच तिच्या स्किन केअर सीक्रेट्स उघड केले आहेत!
Tamannaah Bhatia
तमन्ना म्हणते, "लोकांना वाटतं की सेलिब्रिटींची त्वचा नेहमीच परफेक्ट असते, पण तसं नाही. आम्हाला पिंपल्स येतात, आम्हीही सामान्य माणसांसारखेच आहोत'."
Tamannaah Bhatia
जेव्हा तमन्नाला तिचा खास 'पिंपल हॅक' विचारण्यात आला, तेव्हा ती म्हणाली, "पिंपल आला की मी त्यावर सकाळी उठल्याबरोबर, ब्रश करण्यापूर्वीची लाळ (थुंकी) लावते."
Tamannaah Bhatia
ती म्हणते, "रात्री झोपल्यावर आपलं तोंड बॅक्टेरियाशी लढत असतं आणि त्यामुळे सकाळच्या लाळेमध्ये अँटी-बॅक्टेरियल घटक असतात. ही लाळ पिंपलवर लावल्यास तो लवकर सुकतो."
Tamannaah Bhatia
तमन्नाच्या मते, त्वचेची काळजी तरुण वयातच सुरू करायला हवी.
Tamannaah Bhatia
ती म्हणाली, "मी वयाच्या २४-२५ व्या वर्षापासून कॅमेऱ्यासमोर आहे आणि तेव्हापासूनच मी चांगल्या स्किनकेअर उत्पादनांचा वापर करत आहे."
Tamannaah Bhatia
"जर तुम्हाला अकाली वृद्धत्व टाळायचं असेल आणि त्वचा तरुण ठेवायची असेल, तर वयाच्या २५ व्या वर्षापासून अँटी-एजिंग क्रीम वापरणे खूप फायदेशीर ठरते."
Tamannaah Bhatia
तमन्नाच्या चमकदार त्वचेचं खरं रहस्य महागड्या क्रीम्समध्ये नाही, तर तिच्या आहारात आहे. ती म्हणते, 'त्वचेसाठी क्रीमपेक्षा आहार महत्त्वाचा.'
Tamannaah Bhatia
ती सांगते, "बऱ्याच वर्षांनी मला कळलं की मला ग्लूटेन आणि दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी आहे. हे पदार्थ टाळल्यावर माझी त्वचा आपोआप सुधारली. तुमचं शरीर आतून स्वच्छ असेल, तर त्वचा बाहेरून चमकते."
तमन्ना म्हणते, "कोणताही उपाय करण्याआधी तुम्ही तुमच्या शरीराला समजून घ्या. तुमची जीवनशैली आणि आहार योग्य असेल, तर तुमची त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर दिसेल."
Tamannaah Bhatia
तमन्नाचे हे उपाय तिचे वैयक्तिक अनुभव आहेत. ती म्हणते, "मी डॉक्टर नाही, पण लाळेचा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि मला विश्वास आहे की यामागे विज्ञान आहे."