Disha Patani : बार्बी डॉल म्हणू की अप्सरा...! शॉर्ट ड्रेसमध्ये दिशाचा नवा लूक

पुढारी वृत्तसेवा

बॉलिवूडची 'नॅशनल क्रश' दिशा पटानी हिला आपल्या फॅशन सेन्सने चाहत्यांना घायाळ कसं करायचं हे चांगलंच माहीत आहे. 

ती प्रत्येक वेळी अशा अंदाजात समोर येते की, पाहणाऱ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळून राहतात. 

एका पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिशा इतकी परफेक्ट दिसत आहे की, तिच्यावरून नजर हटवणं जवळपास अशक्य आहे.

पांढऱ्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिशाचा हॉट अवतार! ३३ वर्षांची असूनही ती एखाद्या २१ वर्षांच्या तरुणीप्रमाणे दिसत आहे.

पण या छोट्याशा ड्रेसची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल! दिशाने या ड्रेसवर तब्बल ३४,७०० रूपये खर्च केले आहेत.

या ड्रेसला हॉल्टर नेकलाइन आणि गोल्ड ग्रेडिएंट रिंग्सने अधिक स्टायलिश बनवले आहे, ज्यामुळे तिचा लूक खूपच आकर्षक दिसतोय.

दिशाला 'बॅकलेस क्वीन' का म्हणतात, हे या फोटोवरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. ड्रेसचं बॅकलेस डिझाइन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

एकीकडे चाहते तिच्या सौंदर्यावर फिदा झाले आहेत. कोणी तिला 'बार्बी डॉल' म्हणत आहे, तर कोणी 'अप्सरा'!

पण दुसरीकडे एका चाहत्याच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले. तो म्हणाला, "यार दिशा, आता तुझ्यात ती पूर्वीची बात नाही राहिली..."

Parul Gulati | Parul Gulati instagram-gulati06
डेटिंगसाठी ३० वर्षांखालील मुलंच का आवडतात? अभिनेत्री पारुल गुलाटीने सांगितलं कारण