Hair Dye Kidney Damage | हेअर डायमुळे मूत्रपिंडावर दुष्परिणाम होतो का?

अविनाश सुतार

बहुतेक केसांच्या कृत्रिम रंगांमध्ये पॅरा फेनिलेने डायमाईन (पीपीडी), अमोनिया, रेसोर्सिनॉल आणि लीड एसीटेटसारखी रसायने असतात

ही रसायने आपल्या टाळूद्वारे शरीरात शोषले जाऊन किंवा श्वासाद्वारे आत घेतले जातात

शरीरात जमा झालेली ही रसायने डिटॉक्सिफिकेशनमध्ये सहभागी असलेल्या अवयवांवर विशेषतः मूत्रपिंडांवर परिणाम करतात

मूत्रपिंडांचे मुख्य कार्य म्हणजे रक्त शुद्ध करणे आणि शरीरातील अतिरिक्त पाणी आणि कचरा (टाकाऊ पदार्थ) बाहेर टाकणे

रंगांमधील रसायनांच्या वारंवार संपर्कामुळे मूत्रपिंडावर अधिक भार येऊन त्यांना अधिक काम करण्यास भाग पाडले जाते

दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार किंवा मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढू शकतो

काही व्यक्तींमध्ये पीपीडीमुळे त्वचेची अॅलर्जी आणि शरीरातील रंगपेशींना इजा होते

अमोनिया आणि रेसोर्सिनॉल आपल्या त्वचा आणि श्वसनसंस्थेवर परिणाम करतात

हे दुष्परिणाम टाळण्यासाठी पीपीडी, अमोनिया किंवा तत्सम घातक रसायने असलेले केसांचे रंग टाळा

येथे क्लिक करा