Tai Chi Walking |फक्त ७ मिनिटांत पोटाची चरबी कमी? काय आहे 'तायची वॉकिंग'चा नवा ट्रेंड?

पुढारी वृत्तसेवा

फक्त ७ मिनिटांत पोटाची चरबी कमी करा, असा सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा नव्‍या फिटनेस ट्रेंडबाबत जाणून घेवूया...

भारतात योगासनाला जे स्‍थान आहे तेच चीनमध्‍ये तायची या मार्शल आर्टला आहे.

यात तुम्हाला तुमच्या शरीराचे वजन एका पायावर टाकावे लागते; मग दुसरा पाय हळूच पुढे काढून आधी टाच जमिनीवर टेकवावी लागते.

पुढचे पाऊल टाकण्यापूर्वी वजन हळूहळू त्या पायावर ट्रान्सफर करावे लागते. घाई न करता किंवा गतीचा वापर न करता अत्यंत सजगपणे चालणे हा यामागचा उद्देश आहे.

हैदराबाद येथील केअर हॉस्पिटल्सचे डॉ. संजीब कुमार बेहेरा यांच्या मते, याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे सांध्यांवर खूप कमी दाब पडतो.

ज्येष्ठ नागरिकांसाठी, विशेषतः गुडघेदुखी किंवा पाठदुखीने त्रस्त असणार्‍यांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे.

हृदयाच्या आरोग्याचा विचार केला तर, 'तायची वॉकिंग'हा एक सौम्य एरोबिक व्यायाम प्रकार आहे.

तज्ज्ञांच्या मते, हा व्यायाम कॅलरीज बर्न करणारा वर्कआउट नसल्‍याने त्यामुळे वजन कमी करण्याचा हा एक 'शॉर्टकट' आहे, असे समजणे चुकीचे ठरेल.

तसेच केवळ व्हिडिओ पाहून या हालचाली करणे शरीराची स्थिती (पोश्चर) किंवा सांध्यांचे अलाइनमेंटसाठी धोकादायक ठरू शकते.

तज्ज्ञांच्या मते, योग्‍य मार्गदर्शनाने दररोज १५ ते ३० मिनिटांचा 'तायची वॉकिंग'चा नियमित सराव आरोग्‍यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.

येथे क्‍लिक करा.