side effects of eating late at night : रात्री ९ नंतर जेवताय? पोटावर होतोय 'हा' दुहेरी वार!

पुढारी वृत्तसेवा

भूक लागल्यावर आपण काय आणि किती प्रमाणात खातो, याचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो.

एका ताज्या अभ्यासानुसार, खाण्याची वेळेचा आपल्या पचनाच्या आरोग्यावर आणि 'गट मायक्रोबायोम'वर (पोटातील चांगल्या जीवाणूंवर) परिणाम होतो.

'डायजेस्टिव्ह डिसीज वीक'मध्ये प्रकाशित संशोधनातून रात्री उशिरा खाणे आणि दीर्घकालीन मानसिक ताण यांच्यातील संबंधांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे.

संशोधनात नमूद केले आहे की, रात्री उशिरा खाणे पोटातील मायक्रोबायोमसहित संपूर्ण पचनसंस्थेचे आरोग्य बिघडवतात.

डॉ. दादिगिरी यांच्या नेतृत्वाखालील संशोधन पथकाने मानसिक ताणतणाव आणि खाण्याच्या पद्धतीवर कसा परिणाम होतो? याचा अभ्‍यास केला.

रात्री उशिरा जेवणार्‍यांना बद्धकोष्ठता किंवा अतिसार यांसारखी पोटाची लक्षणे दिसण्याची शक्यता ३९.३% होती. वेळेवर जेवणाऱ्यांमध्‍ये हे प्रमाण केवळ २३.२% होते.

यापूर्वीच्या संशोधनातून असे समोर आले आहे की, 'सर्केडियन रिदम' बिघडल्यास स्मृतीभ्रंश, हृदयविकार यासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.

या अभ्यासात रात्री ९ नंतर खाणे म्हणजे 'उशिरा खाणे' असे गृहीत धरले आहे. परंतु, यामध्‍ये नाईट शिफ्टमध्ये काम करणार्‍यांच्‍या खाण्याच्या सवयींचा विचार केलेला नाही.

संशोधकांनी स्‍पष्‍ट केले आहे की, जेवणाच्या वेळेची शिफारस प्रत्येक व्यक्तीचे वेळापत्रक, शारीरिक रचना आणि जीवनशैलीनुसार ठरवली पाहिजे.

तुम्ही मानसिक ताणाखाली रात्री उशिरा जेवत असाल तर तुम्ही कोणत्या वेळी खात आहात याबद्दल जागरूक राहा," असे हे संशोधन सांगते.

आरोग्‍याचा विचार करताना जेवणाचा दर्जा, वेळ, झोप आणि ताणतणाव यांचा समावेश होतो. यातील एक घटक आरोग्‍यासाठी नुकसानकारक ठरते, हेच संशोधन स्‍पष्‍ट करते.

येथे क्‍लिक करा.