स्वालिया न. शिकलगार
तबूचा आज ५४ वा वाढदिवस आहे
तब्बू आजवर सिंगलच राहिलीय. कधी अजय देवगन तर कधी साऊथ स्टार नागार्जूनसोबत तिचे नाव जोडले गेले होते
तब्बूने लग्न नाही केलं, हे तिचं खासगी कारण आहे आणि तिला सिंगल राहण्यात काही समस्या नाहीये.
पण एकदा तिने मजेत म्हटलं होतं की, ती अजय देवगन सोबतच्या खास मैत्रीमुळे सिंगल आहे
कारण बालपणात अजय आणि तिचा चुलत भाऊ समीर आर्य तिला मुलांसोबत बोलण्यास देत नसत
तिने असेही म्हटले की लग्न हा एखाद्याचे मूल्य ठरवण्याचा निकष नाही.
तब्बूने हे स्वीकारलं की, लग्न करण्याचा दबाव नेहमीच राहिलं आहे
परंतु, प्रत्येकाची स्वतःची विशिष्ट परिस्थिती असते आणि ती तिच्या अविवाहित राहण्याचे श्रेय तिला देते