स्वालिया न. शिकलगार
स्वित्झर्लंडमध्ये प्रत्येक व्यक्ती वर्षाला सरासरी १० ते ११ किलो चॉकलेट खाते, जे जगात सर्वाधिक आहे
पण एवढं गोड खाऊनही तिथले लोक लठ्ठ होत नाहीत. याचं गुपित काय?
उत्तर आहे- Hiking! स्विस लोकं डोंगर चढणं आणि ट्रेकिंग करतात
आल्प्स पर्वताच्या रांगांमध्ये कधी कधी ते तासनतास हायकिंग करतात
ज्यामुळे त्यांच्या शरीरातील अतिरिक्त कॅलरीज सहज बर्न होतात
विशेष म्हणजे, डोंगर चढताना थकवा येऊ नये, झटपट ऊर्जा मिळावी म्हणून ते सोबत चॉकलेट खातात
पायी चालणे, सायकलिंग करणे, शुद्ध हवेत राहिल्यामुळे त्यांची पचनशक्ती मजबूत होते
भरपूर चॉकलेट खायचं आणि निसर्गाच्या सानिध्यात ते तितक्याच ताकदीने पचवायचं
हा स्विस लोकांचा फिटनेस मंत्र आहे!