स्वालिया न. शिकलगार
कापूरदानी म्हणजे केवळ सुगंध पसरवणारे साधन नसून भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा भाग मानला जातो.
विशेषतः भीमसेन कापूर आपल्या नैसर्गिक सुगंधासाठी ओळखला जातो.
कापूरदानीमध्ये कापूर ठेवून त्याचा सुगंध घरभर पसरवण्याची परंपरा अनेक कुटुंबांमध्ये पाहायला मिळते.
अनेकांच्या मते, कापूराचा सुगंध तणाव कमी करण्यास व मन शांत करण्यास मदत करू शकतो.
भीमसेन नैसर्गिक स्वरूपातील कापूर मानला जातो. त्याचा सुगंध साध्या कापूरापेक्षा वेगळा, तीव्र असतो.
कापूर जाळणे हे शुद्धतेचे प्रतीक मानले जाते.
कापूर प्रज्वलित केल्याने नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होते.
आधुनिक जीवनातील तणावाच्या काळातही अशा पारंपरिक पद्धती लोकांना मानसिक समाधान देत आहेत.