Namdev Gharal
रताळं जे आपण उपवासाला घेतो पण तुम्हाला माहिती आहे का दररोज एक उकडलेले रताळ खालं तर तुम्हाला अनेक फायदे मिळतात
जमीनीत उगवत असल्याने रताळ्यामध्ये व्हिटॅमिन A (बीटा-कॅरोटीनच्या स्वरूपात), व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B6, आणि व्हिटॅमिन E व आयर्न, पोटेशिअम, कॉपर ही मिनरल्स असतात
याचा एक फायदा म्हणजे याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो त्यामुळे मधूमेही सुद्धा दररोज अर्ध रताळं खाऊ शकतात
जर तुम्ही रताळे उकडून खाल्ले, तर त्याचा GI कमी राहतो, जो रक्तातील साखर वेगाने वाढवत नाही. मधुमेहींनी ते भाजून खाऊ नये
रताळ खाल्लं तर तुम्हाला भरपूर उर्जा मिळते फायबरचे प्रमाण जास्त असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पचन सुधारते
यातील पोटॅशियम रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रित ठेवण्यास मदत करते त्यामुळे हृदयावरील ताण कमी येतो
व्हिटॅमिन A चा उत्तम स्रोत असल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते तसेच व्हिटॅमिन E मुळे त्वचा तजेलदार राहते आणि केसांचे आरोग्य सुधारते
रताळ्याचे पदार्थ जसे पराठे, खीर जर तुमच्या आहारात ठेवले तर सततचा थकवा अशक्तपणा कमी झाल्याचे दिसून येईल
त्यामुळे रताळं हे तुमच्या त्वचा, हाड, डोळे, यासाठी उपयुक्त ठरत असल्याने सहज उपलब्ध होणारे देशी सुपर फूड आहे.