Namdev Gharal
भात खाल्याने वजन वाढते का?, हा प्रश्न खूप कॉमनपणे विचारला जातो पण हे सत्य आहे अतिप्रमाणात भात खाल्ला तर वजन वाढते
कारण भातामध्ये खूप प्रमाणात कर्बोदके असतात, खूप स्टार्च असतात त्यामुळे तुम्ही अतिप्रमाणात भात खालात तर तुमचे वजन वाढणार
पण तुम्ही विचार केला आहे का भारताच्या दक्षीणेकडील राज्यात किंवा कोकणात भरपूर प्रमाणात भात खाल्ला जातो पण ते सडपातळ असतात असे का?
तर तुम्ही भाताबरोबर काय खाता त्यावर तुमचे वजन वाढणार की घटनार हे अवलंबून असते, तुम्ही अती कार्ब असणारे पदार्थ घेतले तर तुमचे वजन वाढणार
तुम्ही बऱ्याच वेळा वेगवेगळे तांदूळ वापरुन बघता पण काही केले तरी भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स् सेम असतो.
दुसरी गोष्ट तुम्ही जर भात शिजवताना उघड्या भांड्यात शिजवला तर त्यावरील पेज काढून टाकता येते. यामुळे तुमचे वजन वाढणार नाही
तांदूळ आधी तुम्ही परतवून घेतला पाहिजे नंतर तो शिजवला पाहिजे त्यामुळेही वजन वाढणार नाही
योग्य प्रमाणात खाणे, कधीही भात खाताना तो योग्य प्रमाणात खाल्ला तर तुम्हाला पोषण मिळेल व वजन वाढणार नाही