SHRAVAN FASTING SUPERFOOD: श्रावणात बटाटा नको, रताळे खा! जाणून घ्या या 'सुपरफूड'चे आश्चर्यकारक फायदे

पुढारी वृत्तसेवा

पांढऱ्यापेक्षा लाल रताळी चवीला अधिक गोड असतात आणि आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर मानली जातात.

रताळ्याच्या वेली जमिनीवर ८ ते १० फूट पसरतात; मुबलक सूर्यप्रकाश आणि मध्यम पावसात हे पीक उत्तम येते.

महाराष्ट्रात उपवासाच्या दिवशी रताळ्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो; हे शरीराला झटपट ऊर्जा देते.

निखाऱ्यावर भाजलेली किंवा वाफवलेली रताळी खायला अत्यंत स्वादिष्ट आणि गोड लागतात.

रताळ्याच्या भाजीत वांगी घातल्यास त्याचा वायुकारक दोष दूर होतो आणि भाजी सहज पचायला मदत होते.

केवळ कंदच नाही, तर रताळ्याची कोवळी पानेही अतिशय पौष्टिक असतात आणि काही भागांत त्यांची भाजी बनवली जाते.

रताळ्यापासून स्टार्च, अल्कोहोल, पेक्टिन, कॅरोटीन आणि सिरप यांसारखे अनेक महत्त्वाचे घटक तयार केले जातात.

रताळ्यात १६% स्टार्च आणि ४% नैसर्गिक शर्करा असते; तसेच हे कॅल्शियम आणि पोटॅशियमने समृद्ध असते.

बटाट्याच्या तुलनेत रताळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन 'ए' चे प्रमाण अधिक असते.

आयुर्वेदानुसार रताळे पचायला जड असले तरी ते शरीराला थंडावा देणारे आणि बलवर्धक (ताकद देणारे) आहे.

येथे क्‍किल करा.