पुढारी वृत्तसेवा
जिरे हे केवळ जेवणाची चव आणि सुगंध वाढवणारे मसाले नसून, ते अनेक आजारांवर अत्यंत गुणकारी औषध मानले जाते.
पांढरे जिरे, शहाजिरे (काळे जिरे) आणि कलौंजी जिरे असे याचे प्रकार असून, तिन्ही प्रकारच्या जिऱ्यांमध्ये जवळजवळ सारखेच गुणधर्म असतात.
महर्षी चरक यांच्या मते जिरे हे पोटदुखी आणि तीव्र वेदना घालवणारे 'शूळहारक' आहे.
महर्षी सुश्रुत यांच्या मते जिरे वात अरुचिनाशक, दीपक (पाचक) आणि गुल्म व शूळहारक आहे.
युनानी वैद्यांच्या मते जिरे सुगंधी आणि ग्राही आहे; जिऱ्याच्या पाण्याने डोळे धुतल्यास डोळ्यांचे तेज वाढते.
जिरे जठर, यकृत व आतड्यांना मजबूत बनवते; पोटात वायू असणे, अपचन आणि मलावरोध यांसारखे विकार जिऱ्याच्या सेवनाने दूर होतात.
धन्या-जिऱ्याचे चूर्ण साखरेत मिसळून घेतल्यास पित्ताची जळजळ थांबते, तर गुळासोबत जिऱ्याचे चूर्ण घेतल्यास ताप कमी होण्यास मदत होते.
भाजलेले जिरे, मिरे व सैंधव ताकातून प्यायल्याने अतिसार व मूळव्याधीत आराम मिळतो.
जिरे आणि खडीसाखरेचे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटकांचा प्रभाव कमी होण्यास मदत होते.