Sweet Basil Seeds | सब्जा बी सर्वांसाठी नाही, यांच्यासाठी फायदेशीर तर यांना ठरु शकते त्रासदायक!

पुढारी वृत्तसेवा

उन्हाळ्यात सब्जा घेणे हे फायदेशीर असते अनेकजण विविध कारणांसाठी सब्जा बी पाण्यातून घेतात

ज्यांना पित्ताचा त्रास आहे, जळजळ होते त्‍यांनी सब्जा पाणी घ्यावे, सब्जा पोटातील आतल्या आवरणावर प्रोटेक्टिव्ह लेअर बनवतो त्‍यामुळे जळजळ कमी होते

ज्यांना बॉडी हिट जास्त आहे उष्णतेचा त्रास होतो. अशावेळी शरीर थंड ठेवण्यासाठी सब्जा खूप फायदेशिर ठरतो

ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे त्‍यांनी घ्यावा कारण त्‍यामध्ये सोल्यूबल फायबर असते जे पोट साफ होण्यास मदत करते

काही लोकांना जास्त घाम येतो, डिहायड्रेशनचा सतत त्रास होतो अशा लोकांसाठी सब्जा उपयुक्त ठरतो

या लोकांनी मात्र सब्जा घेऊ नये यामध्ये ५ वर्षांखाली लहान मुले यांना देऊ नये अन्न नलिकेत चोकिंग होऊ शकते

ज्या लोकांना लो बीपीचा त्रास आहे अशांनी सब्जाचे सेवन करु नये, कारण सब्जामुळे शरीर थंड राहते

आयबीएस, ब्लोटींग पोटाच्या तक्रारी असलेल्यांनी किंवा पचन क्रिया मंद असलेल्यानी सब्जाचे सेवन टाळावे, कारण सब्जा पाण्यात फुगतो त्‍यामुळे हे त्रास वाढू शकतात

लूज मोशन असल्यास सब्जाचे सेवन टाळावे, यामुळे अजूनही जास्त प्रमाणात त्रास वाढू शकतो

Chaturmas 2025 Tulsi Lamp Benefits | Canva
येथे क्लिक करा