Mental Health: 'या' देशात डॉक्टरच देतायत 'फिरायला' जाण्याचं प्रिस्क्रिप्शन

Anirudha Sankpal

स्वीडनमध्ये आता डॉक्टर केवळ औषधेच नाही, तर रुग्णाच्या मानसिक सुदृढतेसाठी अधिकृतपणे प्रवासाचे प्रिस्क्रिप्शन देऊ शकणार आहेत.

हा प्रवास कोणत्याही लक्झरीसाठी नसून तणाव, दैनंदिन कंटाळवाणे रुटीन आणि 'बर्नआउट' (अति थकवा) मधून बाहेर पडण्यासाठी आहे.

नवीन वातावरण तुमच्या मज्जासंस्थेला (Nervous System) रीसेट करण्यास मदत करते, ज्यामुळे मानसिक थकवा दूर होतो.

संशोधनानुसार, प्रवासातील नवीन अनुभवांमुळे मेंदूत 'डोपामाइन' वाढते आणि मानसिक स्पष्टता निर्माण होते.

प्रवासामुळे जुनाट तणाव कमी होतो, मूड सुधारतो आणि नैराश्याची लक्षणे कमी होण्यास मोठी मदत मिळते.

स्वीडनने हे मान्य केले आहे की, 'बर्नआउट' ही वैयक्तिक अपयश नसून शरीराला विश्रांतीची गरज असल्याचे एक जैविक लक्षण आहे.

अनेकदा प्रभावी उपचार हे औषधाच्या गोळीमध्ये नसून नवीन दृष्टीकोन, मोकळी हवा आणि बदललेल्या क्षितिजामध्ये असतात.

केवळ विश्रांतीने नाही, तर वातावरणातील बदलामुळे मेंदू खऱ्या अर्थाने पूर्वपदावर येतो आणि अधिक कार्यक्षम होतो.

जर तुम्हाला मनातून खूप थकल्यासारखे वाटत असेल, तर तुम्हाला शिस्तीची नाही तर थोड्या अंतराची आणि प्रवासाची गरज असू शकते.

येथे क्लिक करा