Benefits of Sweating | दुर्गंधी येत असली तरी घाम येण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क

पुढारी वृत्तसेवा

घाम येऊ नये म्हणून बराच खटाटोप केला जातो. परंतु, घाम येण्याचे आरोग्यदायी फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल

घाम येणे हे कोणत्या रोगांचे लक्षण नसून घाम येणे हे एक चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे शरीर स्वच्छ होऊन हानीकरक गोष्टी बाहेर टाकल्या जातात

घाम येणे ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी शरीर या प्रक्रियेचा वापर करून शरीरातील विविध रसायने आणि हार्मोन्स यांचे संतुलन कायम ठेवते

घाम ही शरीराचे संरक्षण करणारी नैसर्गिक पद्धती असून घाम येण्यामुळे शरीर थंड राहून शरीराचे उष्णतेपासून संरक्षण होते

घाम आल्याने वेगवेगळ्या संसर्गांपासून शरीराचा बचाव होतो. जेव्हा घाम येत नाही तेव्हा ब्लड प्रेशर वाढते, तसेच ताप देखील येतो

भरपूर घाम आल्यास शरीरातील कॅलरी बर्न होऊन वजन कमी होण्यास मदत होते. शरीरातील कॅलरी बर्न होऊन घामावाटे बाहेर टाकल्या जातात

नियमित घामामुळे शरीर डिटॉक्स होऊन हानिकारक द्रव्य पदार्थ बाहेर टाकले जातात

शरीर डिटॉक्स झाल्यास शरीरातील मृत पेशी बाहेर टाकल्या जातात. त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते

घामामध्ये अँटी मायक्रोबियल पेप्टाथाईड नावाचा पदार्थ असतो. या पदार्थामुळे क्षयरोगासारख्या असाध्य व्याधीशी लढण्यास मदत होते, पण जास्त घाम येत असेल तर डॉक्टरचा सल्ला घ्यावा

येथे क्लिक करा