Lal Mathachi Bhaji | पावसाळ्यात तांबडी माठ खाण्याचे जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

पुढारी वृत्तसेवा

तांबडी माठ (लाल माठ) भाजी पावसाळ्यात खाऊ शकता. मात्र ती स्वच्छ धुऊन, नीट शिजवून खाणे महत्त्वाचे आहे

तांबड्या माठात लोह (Iron) आणि फोलेट भरपूर असते. हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते आणि अशक्तपणा कमी करण्यास उपयोगी ठरू शकते

या भाजीत जीवनसत्त्व A, C आणि इतर अँटिऑक्सिडंट्स असतात, पावसाळ्यात संसर्गाचा धोका असल्याने शरीराची प्रतिकारशक्ती टिकवण्यास मदत होते

भाजीत फायबर भरपूर असल्यामुळे बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते, आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊन पचन क्रिया सुरळीत राहते

भाजीतील बीटा-कॅरोटीन आणि जीवनसत्त्व A मुळे डोळ्यांच्या आरोग्यास मदत होते, त्वचा निरोगी ठेवण्यासही उपयोगी ठरते

भाजीत कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन K असल्यामुळे हाडांच्या आरोग्यास मदत होऊन हाडे मजबूत होतात

भाजीत पोटॅशियम आणि नैसर्गिक नायट्रेट्समुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होऊल हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते

निरोगी प्रौढ व्यक्तीसाठी तांबडी माठ भाजी आठवड्यात 2–3 वेळा इतर पालेभाज्यांसोबत आळीपाळीने खाणे संतुलित आहाराचा भाग ठरू शकते.

पावसाळ्यात तांबडी माठ भाजी खाणे सुरक्षित आणि पौष्टिक आहे, परंतु ती स्वच्छ धुऊन, पूर्णपणे शिजवून आणि ताजीच खावी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

येथे क्लिक करा