अविनाश सुतार
सुरक्षेची भावना वाढवते
कुत्रा नेहमी सतर्क असतो. त्यामुळे तो जवळ झोपल्यास आपल्याला सुरक्षित वाटते आणि मन निर्धास्त राहते. रात्री भीती किंवा असुरक्षिततेची भावना राहत नाही
नैराश्य कमी करते
पाळीव प्राणी जवळ असला की ‘ऑक्सिटोसिन’ (प्रेमाचे हार्मोन) आणि ‘सेरोटोनिन’ (मूड नियंत्रक हार्मोन) यांचे प्रमाण वाढवते. ज्यामुळे नैराश्य कमी होते
नात्यातील बंध अधिक मजबूत होतो
कुत्र्यांना गटात राहण्याची सवय असते. त्यामुळे मालक आणि कुत्रा यांच्यातील जवळीक आणि विश्वास वाढतो
अॅलर्जीचा धोका कमी होतो
अभ्यासानुसार लहानपणी कुत्र्यासोबत झोपलेल्या मुलांमध्ये पुढील आयुष्यात अॅलर्जी होण्याचा धोका कमी आढळतो
उत्तम झोप मिळते
कुत्रा सोबत असल्यास झोपेची गुणवत्ता वाढवते. त्याच्यामुळे सुरक्षिततेची भावना निर्माण होते, त्यामुळे मन शांत होते आणि झोप अधिक गाढ लागते
अनिद्रा (झोप न येणे) कमी होते
कुत्र्यासोबत झोपल्याने तुम्ही अधिक आरामशीर होता. तुमची मनःस्थिती स्थिर राहते. त्यामुळे झोप लागण्यास मदत होते
हृदय निरोगी ठेवते
कुत्र्यामुळे आनंद, शांतता आणि समाधान मिळते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो, ताणतणाव कमी होतो आणि कोलेस्टेरॉलही कमी होते
एकटेपणा दूर होतो
कुत्रा हा माणसाचा सर्वोत्तम साथीदार असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही एकटे असता, तेव्हा कुत्रा तुमची सोबत करतो आणि एकटेपणा जाणवत नाही
ताणतणाव कमी होतो
कुत्र्यासोबत असताना ऑक्सिटोसिनचे प्रमाण वाढते आणि मन शांत होते. त्यामुळे रात्री झोपताना तुमचे मन अधिक शांत आणि तणावरहित होते