Suri Alpaca : या प्राण्याच्या दुर्मिळ रेशमी फरची किंमत आहे लाखोंच्या घरात

Namdev Gharal

याची लांब मुलायम व रेशमासारखी लोकर खूपच दुर्मिळ असते

याच्या पासून बनवलेल्‍या एका कापडाची किंमत १ ते २ लाख रुपये असते

या प्राण्याला ‘फायबर ऑफ गॉड’ अशी उपाधी मिळाली आहे. हा प्राणी वर्षातून २ ते ४ किलो फर देतो

सुरी अल्‍पाका (suri alpaca) हे या प्राण्याचे नाव असून तो उंट कुळातील प्राणी आहे

Vicugna pacos हे या प्राण्याचे शास्‍त्रिय नाव आहे, पण स्‍थानिक भाषेत सुरी अल्‍पाका असे आहे

सुरी अल्पाकाचा फर हा जगातील सर्वात महागड्या नैसर्गिक धाग्यांपैकी एक मानला जातो.

मूळचा दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतरांगा आहे. विशेषतः पेरू, बोलिव्हिया, चिली आणि इक्वाडोर या देशांमध्ये हा आढळतो.

आता फर मिळवण्याच्या उद्देशाने यांचे पालन अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युरोप आणि काही प्रमाणात जपानमध्येही केलं जातं

याची फर चिकटसर आणि चमकदार असून अत्यंत उबदार व मऊसर असते. पांढऱ्या ते काळ्या, तसेच तपकिरी, राखाडी २० रंगछटा याच्या फरपासून मिळते

लक्‍झरी फॅशन ब्रँड या लोकरीला खूप किंमत देऊन खरेदी करतात व त्‍यापासून अत्‍यंत महागडे कपडे तयार केले जातात.

Blue Footed Booby