Blue Footed Booby : निळे बूट घातलेला पक्षी पाहिला आहे का?

Namdev Gharal

या पक्षाचे नाव आहे ब्‍लू फूटेड बुबी (Blue Footed Booby) हे नाव याच्या पायाच्या निळ्या रंगावरुन पडले आहे.जे निळे बूट घातल्‍यासारखे दिसतात

बुबी (Booby)हे नाव स्‍पॅनिश भाषेतून आले आहे. याचा अर्थ आहे मुर्ख किंवा बावळट (Sula nebouxii) असे याचे शास्‍त्रिय नाव आहे.

कारण हा पक्षी जमीनीवर चालतो तेव्हा अतिशय बावळट दिसतो. त्‍याची चाल गंमतीशीर असते

या पक्षाच्या अशा अजब चालीमुळेच पुर्वीच्या काळातील खलाशांनी या पक्ष्याला हे नाव दिले आहे.

मुळचा हा समुद्री पक्षी असून याचे वैशिष्‍ट्ये म्‍हणजे हा मानसाला घाबरत नाही, या पक्षाचा प्रमुख आहार सार्डीन मासा आहे

सार्डीन माशाच्या शरीरातील कॅरोटानाईड हा पदार्थ असतो जो या पक्ष्यांच्या पोटात जातो व पायामध्ये बाजूस साठतो यामुळेच यांच्या पायांचा रंग निळा होतो

या पक्षांच्या पायाच्या निळ्या रंगावरुन त्‍या पक्षाचा आहार, तो किती स्‍वस्‍थ आहे माहिती मिळते.

ज्‍या नर पक्षाच्या पायाचा रंग गडद, चमकदार निळा असतो अशा पक्ष्यांकडेच मादी आकर्षित होत असते. व आपला साथी निवडते

६2 किमी प्रतितास इतक्‍या वेगाने हे पाण्यात सूर मारतात यामुळे मास्याला चक्रावून टाकतात व सहजरित्‍या शिकार करतात.

या पक्ष्याची शिकार करण्याची पद्धत एखाद्या मिसाईलसारखी असते जी खूपच विलोभनिय वाटते.

Snake Man Of India