पुढारी वृत्तसेवा
मेंदूला सतत ओमेगा-३, व्हिटॅमिन बी, डी, के आणि अँटीऑक्सिडंट्सची गरज लागते. यामुळे मेंदू वेगाने काम करू शकतो.
ओमेगा-३, ६, आणि ९ फॅटी ॲसिड (स्मरणशक्तीसाठी) हे घटक नियमित घेतल्याने तुमची स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता सुधारते आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते.
बी जीवनसत्त्वे (मेंदूच्या कार्यासाठी) व्हिटॅमिन 'बी' मुळे मेंदूतील पेशींची दुरुस्ती होते आणि मेंदूचे संदेश वहन करण्याचे काम सुरळीत चालते.
कोलिन हे एक पाण्यात विरघळणारे पोषक तत्व आहे, जे 'व्हिटॅमिन बी' समूहाशी साधर्म्य राखते. कोलिन मेंदूच्या पेशींना मजबूत ठेवते. नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि त्या लक्षात ठेवण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे.
आहारात अँटीऑक्सिडंट्स समावेश हे मेंदूला घातक घटकांपासून वाचवतात आणि दीर्घकाळ निरोगी ठेवण्यास मदत करतात.
मेंदूमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास उदासीनता (Depression) येऊ शकते किंवा विचार करण्याची शक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे व्हिटॅमिन डीचा आहारा समावेश हवाच.
व्हिटॅमिन के (पेशींच्या आरोग्यासाठी) हे मेंदूच्या पेशींना ऊर्जा देते आणि विचार करण्याची क्षमता चांगली ठेवते.
पॉलीफेनॉलचा आहारात समावेशा केल्यास मेंदूची काम करण्याची गती वाढते, मूड सुधारतो आणि स्मरणशक्तीही वाढते.