Healthy Snacks : कामाच्या वेळी सुस्ती येतेय? एनर्जेटिक ठेवणारे 'हे' सुपर स्नॅक्स ट्राय करा!

पुढारी वृत्तसेवा

कामाच्या रगाड्यात एनर्जी डाऊन होतेय? आजच डाएटमध्ये समाविष्ट करा टेस्टी स्नॅक्स!

केळी आणि संत्र्यासारखी रसरशीत ताजी फळे खाल्ल्याने शरीराला नॅचरल शुगर, व्हिटॅमिन्स आणि फायबरचा उत्तम डोस मिळतो.

मूठभर बदाम, अक्रोड किंवा काजूमधील हेल्दी फॅट्स आणि प्रोटीनमुळे शरीराला लॉन्ग-लास्टिंग एनर्जी मिळते.

प्रोटीन आणि कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत असलेले ग्रीक योगर्ट कामाच्या वेळी शरीरातील ऊर्जेची पातळी एकदम संतुलित राहते.

हलकीशी भुक लागल्यावर कुरकुरीत आणि स्वादिष्ट भाजलेले चणे खाणे हा एक भन्नाट पर्याय आहे.

उकडलेले अंडे किंवा अंड्याचे स्नॅक्स शरीराला भरपूर प्रोटीन आणि आवश्यक न्युट्रिएंट्स पुरवतात.

सफरचंदामधील नैसर्गिक कार्ब्स आणि फायबर शरीराला थकव्यातून बाहेर काढून एका झटक्यात फ्रेशनेस देतात.

निरनिराळे पौष्टिक बिया (सीड्स) आणि सुक्या फळांचे मिश्रण शरीराला इन्स्टंट एनर्जी देऊन मरगळ झटकून टाकते!

येथे क्‍लिक करा.