पुढारी वृत्तसेवा
सनटॅन का होतो?
सूर्याच्या तीव्र किरणांमुळे त्वचेतील मेलानिन वाढते आणि चेहरा काळवंडतो.
थंड पाण्याने चेहरा धुवा
दिवसातून २–३ वेळा थंड पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेला ताजेतवानेपणा येतो.
काकडीचा वापर करा
काकडीचा रस लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो आणि टॅन कमी होतो.
दही आणि बेसन फेसपॅक
दही + बेसन लावल्याने त्वचा उजळते आणि मृत पेशी निघून जातात.
अॅलोवेरा जेल लावा
अॅलोवेरा त्वचेला हायड्रेट करून जळजळ कमी करते.
बटाट्याचा रस उपयोगी
बटाट्याचा रस डाग कमी करून त्वचा उजळवतो.
गुलाबपाण्याचा वापर
गुलाबपाणी त्वचेला फ्रेश ठेवते आणि नैसर्गिक ग्लो देते.
पुरेसे पाणी प्या
हायड्रेशनमुळे त्वचा आतून निरोगी आणि टवटवीत दिसते.
नियमित काळजी घ्या
या उपायांचा नियमित वापर केल्यास त्वचा पुन्हा चमकदार दिसू लागते.