Summer vegetables | उन्हाळ्यात या पाणीदार भाज्यांचे सेवन ठेवेल नैसर्गिकरित्‍या शरीर थंड!

पुढारी वृत्तसेवा

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे आणि पचनसंस्था सुरळीत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्‍यामुळे ऋतूत थंड प्रकृतीच्या आणि पाणीदार भाजांचे सेवन करा!

काकडी: यात सुमारे ९५% पाणी असते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी ही सर्वोत्तम आहे.

दुधी भोपळा: पचायला अतिशय हलका आणि थंड असतो. उन्हाळ्यात होणारा पित्ताचा त्रास कमी करण्यास मदत करतो.

दोडका आणि पडवळ: या भाज्यांमध्ये फायबर भरपूर असते आणि त्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतात.

कारले: चवीला कडू असले तरी उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी हे गुणकारी आहे.

भेंडी: ही उन्हाळ्यातील मुख्य भाजी आहे. यात प्रथिने आणि फायबर चांगले असते.

तोंडली आणि गवार: या हंगामी भाज्या उन्हाळ्यात सहज उपलब्ध होतात आणि शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवतात.

पालक: पालकामध्ये पाणी आणि लोह भरपूर असते, जे उन्हाळ्यातील थकवा दूर करण्यास मदत करते.

माठ आणि तांदुळजा: या भाज्या उन्हाळ्यात खाणे पित्तशामक मानले जाते, त्‍याचबरोबर पुदिन्याचे सेवन शरीराला आतून थंडावा देण्यासाठी उपयुक्त ठरतो.

एनर्जी ड्रिंक्स