पुढारी वृत्तसेवा
आजकाल तरुणाईमध्ये किंवा जेन झीमध्ये एनर्जी ड्रिंक पिण्याची खूप क्रेझ आहे, सध्या उन्हाळा सुरु झाल्याने हे पिण्याचे प्रमाण वाढले आहे.
पण हेच एनर्जी ड्रिंक तुम्हाला तात्पुरती झिंग देत असतील पण आरोग्यावर याचे विपरीत आणि दूरगामी परिणाम होऊ शकतात, अनेक रोगांना निमंत्रण मिळते
हृदयाचे ठोके वाढणे: यामध्ये असलेल्या अति कॅफीनमुळे हृदयाचे ठोके अचानक वाढू शकतात
रक्तदाब वाढणे: एनर्जी ड्रिंक्समुळे रक्तदाब (Blood Pressure) तात्पुरता वाढतो, जो हृदयविकार असलेल्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो.
मधुमेहाचा धोका: एका छोट्या बॉटलमध्येही साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे रक्तातील साखर अचानक वाढते, ज्यामुळे भविष्यात 'टाईप २ मधुमेह' होण्याचा धोका असतो.
या ड्रिंक्समध्ये जास्त कॅलरीज आणि साखरेमुळे वजन झपाट्याने वाढू शकते, ओबेसिटीसाठी ही अशी ड्रिक्स कारणीभूत ठरतात
अस्वस्थता आणि चिडचिड: कॅफीनच्या अतिवापरामुळे हातापायांना कंप सुटणे, अस्वस्थ वाटणे किंवा विनाकारण भीती वाटणे असे प्रकार घडू शकतात.
जर तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री हे पेय घेतले तर झोप न येण्याची समस्या निर्माण होते. निद्रानाश जडू शकतो
एनर्जी ड्रिंक्समुळे लघवीचे प्रमाण वाढते, ज्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकते: त्यातील कृत्रिम रंग आणि प्रिझर्व्हेटिव्हजमुळे किडनीवर अतिरिक्त ताण येतो.
लहान मुले आणि गरोदर स्त्रिया. यांनी ही पेये तर अजिबात पिऊ नयेत यामुळे पुढे अनेक धोके उद्भवू शकतात, याची सूचनाही या पेयांच्या कॅनवर लिहलेली असते
जर तुम्हाला कधीतरी थकवा वाटत असेल, तर त्याऐवजी लिंबू सरबत, नारळ पाणी किंवा ताक पिणे कधीही उत्तम. एनर्जी ड्रिंक्स हे नैसर्गिक ऊर्जेचा पर्याय होऊ शकत नाहीत.