पुढारी वृत्तसेवा
उन्हाळा सुरू होताच तापमान झपाट्याने वाढते. शरीरावर उष्णतेचा ताण वाढतो आणि थकवा, डिहायड्रेशन, उष्माघात यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
त्यामुळे बदलत्या ऋतूंमध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातील पाणी कमी होते. दिवसाला किमान ८–१० ग्लास पाणी पिणे आवश्यक. नारळपाणी, ताक, लिंबूपाणी यांचा आहारात समावेश करा.
तेलकट, तिखट आणि जड पदार्थ टाळा. फळे, सॅलड, काकडी, टरबूज, खरबूज यांसारखे पाण्याचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खा.
दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळा. बाहेर पडताना टोपी, गॉगल, सैल सुती कपडे वापरा. सनस्क्रीन लावायला विसरू नका.
उन्हाळ्यात थकवा जास्त जाणवतो. त्यामुळे ७–८ तासांची झोप आवश्यक आहे.
उन्हाळ्यात संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. हात स्वच्छ धुवा, बाहेरील अन्न टाळा.
चक्कर येणे, मळमळ, जास्त घाम येणे किंवा उलट घाम बंद होणे ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.