Anirudha Sankpal
दुर्गंधीचे मुख्य कारण: घामामुळे नव्हे, तर त्वचेवरील बॅक्टेरिया जेव्हा घामाच्या संपर्कात येतात, तेव्हा रासायनिक प्रक्रियेमुळे शरीराला दुर्गंधी येते.
कडुलिंबाचे पाणी: कडुलिंब अँटी-बॅक्टेरिअल असल्याने, त्याच्या पानांचा अर्क अंघोळीच्या पाण्यात मिसळल्यास शरीरावरील जंतू नष्ट होतात.
लिंबाचा रस: पाण्यात १-२ लिंबांचा रस मिसळून अंघोळ केल्यास बॅक्टेरिया कमी होतात आणि शरीरासह केसांनाही ताजेतवाने वाटते.
गुलाब पाणी: त्वचेला थंडावा आणि नैसर्गिक सुगंध देण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात गुलाब पाण्याचा वापर करणे अत्यंत फायदेशीर ठरते.
बेकिंग सोडा: बेकिंग सोडा एक उत्तम 'क्लीनिंग एजंट' आहे; अर्धा चमचा सोडा पाण्यात मिसळल्याने त्वचेवरील बॅक्टेरियांची वाढ रोखली जाते.
तुरटीचा वापर: तुरटी हे नैसर्गिक अँटी-सेप्टिक आहे. अंघोळीच्या शेवटी तुरटीचे पाणी अंगावर घेतल्यास दुर्गंधीची समस्या कायमची दूर होते.
ताजेपणा टिकतो: या नैसर्गिक गोष्टींच्या वापरामुळे केमिकलयुक्त डियोड्रंटशिवाय तुम्ही दिवसभर फ्रेश आणि उत्साही राहू शकता.
सोपा घरगुती उपाय: बाजारातील महागड्या उत्पादनांपेक्षा अंघोळीच्या पाण्यात या ५ गोष्टींचा वापर करणे हा स्वस्त आणि प्रभावी मार्ग आहे.