पुढारी वृत्तसेवा
उन्हाळ्यात झाडांना दुपारी पाणी देणे टाळा. सकाळी ८ च्या आधी किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर पाणी द्या.
मातीतील ओलावा टिकवण्यासाठी मातीवर पालापाचोळा किंवा सुक्या गवताचे आच्छादन करा.
कडक उन्हात राहणाऱ्या कुंड्या दुपारच्या वेळी सावलीत किंवा 'ग्रीन नेट' खाली ठेवा.
पानांवर पाण्याचा फवारा मारल्याने झाडांना थंडावा मिळतो आणि आर्द्रता टिकून राहते.
कुंड्या एकमेकांच्या जवळ ठेवल्याने झाडांमधील ओलावा टिकतो.
कडक उन्हाळ्यात झाडांना जड रासायनिक खते देऊ नका.
कुंडीच्या खालचे छिद्र उघडे असल्याची खात्री करा, जेणेकरून मुळे कुजणार नाहीत.
माती वरून कडक झाली असेल तर हलकी खुरपणी करा, जेणेकरून पाणी मुळांपर्यंत व्यवस्थित पोहोचेल.
झाडावरील सुकलेली पाने, फुले वेळोवेळी काढून टाका.