पुढारी वृत्तसेवा
स्नेक प्लांट हे घरातील सजावटीसाठी एक उत्तम रोप का मानले जाते हे त्याचे फायदे जाणून घेवूया.
स्नेक प्लांटची देखभाल करणे अत्यंत सोपे आहे.
हे रोप हवेतील 'फॉर्मल्डिहाइड' आणि 'बेंझिन' सारखे विषारी घटक शोषून घेते आणि घरातील हवेची गुणवत्ता सुधारते.
कमी सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणीही स्नेक प्लांट व्यवस्थित वाढू शकते.
स्नेक प्लांटला पाणी घालायचे विसरलात? तर काळजी करू नका! हे रोप कमी पाण्यातही अनेक दिवस जिवंत राहू शकते.
याचे एक पान कापून तुम्ही त्यापासून सहज नवीन रोप तयार करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमच्याकडे अनेक स्नेक प्लांट्स वाढवू शकता.
या रोपाला सहसा कीड लागत नाही, त्यामुळे कीटकनाशकांचा वापर करण्याची गरज भासत नाही.
याची उंच आणि आकर्षक पाने घराच्या कोणत्याही कोपऱ्याची शोभा वाढवतात आणि घराला एक आधुनिक लूक देतात.