Roadrunner Fastest Birds : पक्ष्यांच्या जगातील उसेन बोल्ट (Usain Bolt) माहिती आहे का?

Namdev Gharal

जगातील सर्वात वेगवान मनुष्य म्हणून विख्यात आहे तो जमैकन स्प्रिटंर उसेन बोल्ट, पण तुम्हाला माहिती आहे का पक्ष्यांच्या दुनियेतपण एक वेगवान धावपटू आहे.

या पक्ष्याचे नाव आहे Roadrunner Bird, हा पक्षी पक्ष्यांमध्ये सर्वात वेगवान धावतो. अप्रतिम धावण्याच्या वेगासाठी जगप्रसिद्ध आहे

पक्ष्यांमध्ये नियमाप्रमाणे सर्वाधिक वेग शहामृगाचा (ताशी 70 km) आहे पण वजन उंची याचा विचार करता रोडरनरच खरा रनिंग चॅम्पियन ठरतो. ?

हा अमेरिका (Southwestern USA) – अ‍ॅरिझोना, न्यू मेक्सिको, टेक्सास, कॅलिफोर्निया. उत्तर मेक्सिकोच्या कोरड्या वाळवंटी प्रदेशात आढळतो

रोडरनर ताशी 32 किमी/तास (20 mph) इतक्या वेगाने धावू शकतो. वाळवंटात शिकार पकडताना पळताना हा वेग खूप उपयोगी पडतो.

सरडे, लहान, साप, विंचू , मोठे कीटक, छोटे पक्षी कधीकधी उंदीरही खातो त्‍यामुळ भक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी तसेच शस्त्रूंपासून वाचण्यासाठी वेगच कामाला येतो

उसेन बोल्ट व याची तुलना केल्यास बोल्ट हा 100 ते 200 मिटर अंतरापर्यंत जलद गतीने धावू शकतो, बोल्टचा वेग हा 44.72 km/h इतका आहे पण काही सेकंद

पण लांबच्या अंतरामध्ये रोडरनर सहज बोल्ट हरवू शकतो कारण हा पक्षी आपला 32 किमीचा वेग भक्ष्याचा पाठलाग करताना तासभर टिकवून ठेऊ शकतो.

Roadrunner ची लांबी ही 50–60 सेमी तर वजन: 230–430 ग्रॅम असते. शरीर चपळ, उंच पाय व लांब शेपूट हे याचे ओळखण्याचे लक्षण आहे.

रोडरनर उडू शकतो पण खूप कमी अंतरासाठी. त्याचे संपूर्ण जीवन धावणे, जमिनीवर शिकार करणे आणि वाळवंटात वेगवान हालचाली करण्यावर अवलंबून आहे

यांचा आवाज मधुर "coo-coo" सारखा असतो. सकाळी सूर्यप्रकाशात पंख फुलवून शरीर गरम करणे ही याची खास सवय. Navajo व Apache या अमेरिकन जमातींमध्ये हा पक्षी सुदैव व संरक्षणाचे प्रतीक मानला जातो.

शहामृगाची पॉवरफूल किक