तुम्हीही ऊसाच्या रसाचे शौकीन आहात? 'या' लोकांसाठी हा रस आहे धोकादायक!

पुढारी वृत्तसेवा

ऊसाचा रस आरोग्यासाठी गुणकारी असले, तरी काही लोकांसाठी तो 'गोड विष' ठरू शकते.

मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांनी उसाचा रस टाळणेच हिताचे आहे, कारण यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढते.

Lifestyle Changes for Diabetes | Pudhari

ज्यांना पचनाच्या समस्या किंवा वारंवार जुलाब होतात, त्यांच्यासाठी ऊसाचा रस त्रासदायक ठरू शकतो.

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर ऊसाच्या रसातील अतिरिक्त कॅलरीज तुमचे डाएट बिघडवू शकतात.

ऊसाचा रस थंड प्रकृतीचा असल्याने, ज्यांना सर्दी-खोकल्याचा वारंवार त्रास होतो त्यांनी तो जपून प्यावा.

Cold And Flu Reason | pudhari photo

दातांच्या समस्या किंवा कॅव्हिटी असल्यास ऊसाच्या रसातील नैसर्गिक साखर दातांचे नुकसान करू शकते.

Home treatment for dental pain | (Canva Photo)

रस्त्यावरील उघड्यावरचा रस प्यायल्याने संसर्ग (Infection) होण्याचा धोका वाढतो, विशेषतः कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी.

म्हणूनच, ऊसाचा रस पिण्यापूर्वी तुमची शारीरिक स्थिती आणि आरोग्याच्या मर्यादा नक्की तपासा!

pudhari photo
येथे क्लिक करा...