पुढारी वृत्तसेवा
भारताचा निसर्ग खजिना
आपल्या भारत देशात अशी अनेक फळे आहेत जी चवीला अप्रतिम आहेत, पण एक फळ असं आहे जे संपूर्ण जगात फक्त भारतातच आढळते.
ओळखा पाहू हे फळ?
आम्ही बोलत आहोत 'फणसा'बद्दल (Jackfruit) नाही, तर 'करवंदा'बद्दल (Karonda) ज्याला 'ब्लॅक बेरी ऑफ इंडिया' म्हटले जाते.
करवंदाचे वैशिष्ट्य
करवंद हे फळ प्रामुख्याने भारताच्या कोकण किनारपट्टीवर आणि डोंगराळ भागात नैसर्गिकरीत्या उगवते.
जगात इतरत्र दुर्मिळ
इतर अनेक फळांची लागवड विदेशात केली जाते, मात्र अस्सल गावरान करवंद इतर कोणत्याही देशात अशा स्वरूपात मिळत नाहीत.
आरोग्यासाठी वरदान
हे फळ दिसायला छोटे असले तरी व्हिटॅमिन सी आणि लोहाचा (Iron) यात मोठा साठा असतो.
कच्ची करवंदे आंबट तर पिकलेली करवंदे गोड-धोड लागतात, ज्यामुळे त्याची चटणी आणि लोणचे अतिशय लोकप्रिय आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत रानोमाळ फिरून करवंद खाण्याची मजा फक्त भारतीयांनाच घेता येते.
भारताच्या मातीतलं हे 'काळं मणी' खरोखरच दुर्मिळ आणि अनमोल आहेत