Artificial sweeteners: साखर टाळली, पण 'गोड' मात्र हवंच? कृत्रिम गोडव्याचं 'हे' सत्य तुम्हाला माहिती आहे का?

मोनिका क्षीरसागर

'साखर नको' म्हणता, पण 'गोड' मात्र हवंच! हा आजकालचा नवा ट्रेंड आहे.

Stevia, Sucralose, Aspartame... रोज एक नवा 'गोड पर्याय' समोर येतोय. पण हे 'Sugar Free' स्वप्न खरंच सुरक्षित आहे का?

कृत्रिम गोडवा: ही केवळ साखरेला टाळण्याची युक्ती आहे, गोड खाण्याची सवय मोडण्याचा उपाय नाही.

काही sweeteners पोटातील चांगल्या जीवाणूंना कमी करतात, ज्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो.

गोड चव मेंदूला कळते पण रक्तातील साखर वाढत नाही. यामुळे शरीरात हार्मोनल गोंधळ होण्याची शक्यता असते.

काही संशोधनानुसार, artificial sweetenersमुळे cravings वाढतात आणि अति खाणं होतं. त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढू शकतं.

या 'गोड पर्यायां'चा मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. काही लोकांना चिडचिड किंवा डोकेदुखीचा त्रास जाणवतो.

FDA ची मान्यता असली तरी, lifelong रोजच्या वापराचा धोका अजूनही पूर्णपणे स्पष्ट नाही.

जर गोड खाण्याची इच्छा झाली, तर ती सवय म्हणून न ठेवता कधीतरी 'चवीसाठी' खा.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, केवळ साखर टाळल्याने फरक पडत नाही. त्याऐवजी नियमित व्यायाम करा, यामुळे गोड खाण्याची इच्छा नैसर्गिकरित्या कमी होईल!

येथे क्लिक करा...