पुढारी वृत्तसेवा
दिवसाची सुरुवात योग्य सवयींनी केल्यास साखर नियंत्रणात राहते. हे विशेषतः मधुमेही लोकांसाठी खूप फायदेशीर ठरते.
सकाळी उठल्या उठल्या १ ग्लास पाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेट होते आणि चयापचय क्रिया (Metabolism) सुधारते.
सकाळचा नाश्ता कधीही टाळू नका. संतुलित नाश्त्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही.
नाश्त्यात अंडी, पनीर किंवा दह्याचा समावेश करा. प्रथिने रक्तातील साखर वेगाने वाढू देत नाहीत.
सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसा. यामुळे शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते.
सकाळी थोडा वेळ चाला, योगा करा किंवा स्ट्रेचिंग करा. यामुळे शरीरातील साखर ऊर्जेसाठी वापरली जाते.
सकाळी साखर घातलेला चहा, कॉफी किंवा ज्यूस पिणे टाळा. यामुळे साखर लगेच वाढू शकते.
तणावामुळेही शरीरातील साखर वाढते. सकाळी जास्त टेन्शन घेऊ नका. शांत राहण्यासाठी दीर्घ श्वास घ्या किंवा ध्यान (Meditation) करा.
आज दिवसभरात काय खायचे आहे, याचे नियोजन आधीच करा. यामुळे तुम्ही बाहेरचे किंवा अयोग्य पदार्थ खाणे टाळाल.
टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. कोणत्याही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.