Mango City India|'या' शहराला का म्‍हटलं जातं 'मँगो सिटी'!

पुढारी वृत्तसेवा

पश्चिम बंगालमधील मालदा दरवर्षी मोठ्या प्रमाणात उच्च दर्जाच्या आंब्यांचे उत्पादन करण्यासाठी प्रसिद्ध आहे.

येथे हिमसागर, लंगडा, फजली आणि लक्ष्मणभोग यांसारख्या प्रीमियम जातींचे आंबे आढळतात. विशिष्ट गोडवा, सुगंध आणि पोतासाठी येथील आंबा ओळखला जातो.

मालदाची सुपीक जमीन आणि पोषक हवामान शतकानुशतके आंबा लागवडीसाठी पूरक ठरले आहे. यामुळे या फळाशी शहराचे सांस्कृतिक आणि आर्थिक नाते आहे.

या प्रदेशातील आंब्याचा पट्टा ३०,००० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेला आहे. मालदा हे भारताचे निर्विवाद 'मँगो सिटी' ठरले असून, जाणून घेवूया येथील येथील आंब्याच्या प्रसिद्ध जाती...

हिमसागर हा बिना कोयीचा/धाग्यांचा अत्यंत गोड आंबा असून त्याचा गर गडद पिवळा असतो. ही सर्वात जास्त मागणी असलेली जात असून तिचा हंगाम कमी काळ असल्याने आंबे लवकर विकले जातात.

लंगडा हा मऊ पोत आणि किंचित आंबट-गोड चवीसाठी प्रसिद्ध असलेला आंबा पिकल्यावरही हिरवाच दिसतो. याची देशभर मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जातो.

फजली हा आकाराने मोठा आणि मध्यम गोडवा असलेला हा आंबा जास्त काळ टिकतो, त्यामुळे व्यावसायिक वापर आणि निर्यातीसाठी तो उत्तम आहे.

सोनेरी रंगाची साल आणि घट्ट गर असलेल्या लक्ष्मणभोग या आंब्याला GI टॅग मिळाला आहे. मालदातून निर्यात होणाऱ्या प्रमुख जातींपैकी ही एक आहे.

मालदाच्या हिरव्यागार आमराई उन्हाळ्यात पर्यटक फिरू शकतात, थेट झाडावरून फळे तोडून चाखू शकतात आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या शेती पद्धतींची माहिती घेऊ शकतात.

येथे क्‍लिक करा.