Diabetes Diet | साखर नियंत्रणासाठी मधुमेही रुग्णांनी 'या' भाज्या खाव्यात

पुढारी वृत्तसेवा

कारल्याच्या भाजीमुळे रक्तातील साखर नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत होते, त्यामुळे मधुमेहींसाठी ही भाजी सर्वोत्तम मानली जाते

भेंडीच्या भाजीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते

दुधी भोपळ्यात साखरेचे प्रमाण खूप कमी असते, पचनास हलका असून साखर नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतो

मेथीच्या भाजीमधील नैसर्गिक घटकांमुळे इन्सुलिनची कार्यक्षमता वाढविण्यास मदत होते

100 ग्रॅम ब्रोकोलीमध्ये केवळ 2 ग्रॅम साखर असते. भरपूर जीवनसत्त्वे व खनिजे असल्यामुळे ब्रोकोली मधुमेह रुग्णांसाठी वरदान ठरते

फायबर, जीवनसत्त्वे व खनिजांनी समृद्ध असलेली फुलकोबी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते

लोह, फायबर व अँटीऑक्सिडंट्स या घटकांनी समृद्ध असणाऱ्या पालकच्या भाजीमुळे साखर नियंत्रित ठेवली जाते

कमी चरबीयुक्त कोबीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, सोडियम ही खनिजे व विविध जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात

मुळा फायबरयुक्त असून रक्तातील साखर संतुलित ठेवण्यास मदत करतो

येथे क्लिक करा