पुढारी वृत्तसेवा
प्राण्यांच्या चाव्याची शक्ती PSI (Pounds per Square Inch) मध्ये मोजली जाते. वाघ आणि सिंह यांच्या जबड्याच्या शक्तीची तुलना Bite Force (चावण्याची ताकद) या निकषावर केली जाते
वाघाच्या जबड्याचा Bite Force 1000 –1100 PSI असतो. त्यामुळे त्याचा जबडा जास्त शक्तिशाली असतो. वाघाचे सुळे जास्त लांब आणि जाड असतात
सिंहाच्य़ा जबड्याचा Bite Force 600–650 PSI असल्याने वाघाच्या तुलनेने सिंहाचा जबडा कमी शक्तिशाली असतो
वाघ हा एकट्याने मोठ्या शिकार (गवा, हरिण, रानडुक्कर) करत असतो, त्यामुळे निसर्गाने त्याला प्रचंड ताकदीचा जबडा दिला आहे
वाघाच्या कवटीचा आकार असा असतो की तो जबड्यावर अधिक दबाव निर्माण करू शकतो. त्याच्या जबड्याचे स्नायू खूप जाड आणि लवचिक असतात. त्यामुळे हाडे चिरडण्याची क्षमता अधिक असते
वाघाची एकट्याने शिकार करण्याची पद्धत (solitary hunter) असल्याने तो मोठ्या प्राण्यांच्या मानेवर किंवा घशावर जोरदार चावा घेऊन शिकार संपवतो
मजबूत पण वाघापेक्षा थोडी हलकी कवटी सिंहाची असते, त्यामुळे जबड्याची ताकद वाघाच्या तुलनेत कमी असते
सिंह मिळून शिकार करतात, कळपाने हल्ला करून शिकार थकवून मारतो, त्याची ताकद समूहातील सहकार्यात आहे, त्यामुळे त्यांना शक्तिशाली जबड्याची गरज भासत नाही
वाघाचा जबडा सिंहापेक्षा अधिक शक्तिशाली असतो. त्याची कवटी मोठी, स्नायू जाड आणि तो एकट्याने शिकार करत असल्यामुळे त्याची चावण्याची ताकद सिंहापेक्षा जास्त विकसित असते