Snake Safety Tips : अचानक नाग समोर आला; असे करा स्वत:चे संरक्षण

पुढारी वृत्तसेवा

नाग सर्वाधिक विषारी सापांपैकी एक असून दरवर्षी त्याच्या दंशामुळे अनेक जणांचा मृत्यू होतो

अचानक नाग समोर आल्यास भीतीपोटी किंवा गोंधळून चुकीची कृती केल्यास दंश होण्याची शक्यता वाढते

नाग जवळ आल्यास शांत राहा. धावपळ केल्यास साप स्वतःच्या बचावासाठी हल्ला करू शकतो

नागाला धोका जाणवला की तो फणा उभारून फुत्कारतो. अशा वेळी सापाकडे डोळ्यात डोळे घालून पाहू नका; त्याऐवजी नजर खाली ठेवा आणि हळूहळू मागे सरका

नाग बहुतांशी केवळ मार्ग मोकळा नसल्यास दंश करतो. त्याला निसटण्याचा मार्ग मोकळा ठेवा. सापाला मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नका

नाग आपल्या शरीराच्या जवळजवळ एकतृतीयांश लांबीपर्यंत झेप घेऊन हल्ला करू शकतो. त्यामुळे त्याच्यापासून किमान ६ ते ८ फूट अंतर ठेवा

दंश झाल्यास घाबरल्यास विष शरीरात अधिक वेगाने पसरते. दंश झालेला अवयव हृदयाच्या पातळीवर स्थिर ठेवा. विष शोषण्याचा किंवा घट्ट बांधण्याचा प्रयत्न करू नका

नाग घराच्या परिसरात शिरू नये, यासाठी उपाययोजना करा. परिसर स्वच्छ ठेवा व कचरा टाळा

ज्या भागात साप आढळतात तेथे चालताना, विशेषतः रात्री, काळजी घ्या. टॉर्च वापरा व मजबूत चपला घाला

येथे क्लिक करा