Cobra Dry Bite | नाग ‘ड्राय बाईट’ करतो म्हणजे काय? मृत्यू होऊ शकतो का?

अविनाश सुतार

नाग ‘ड्राय बाईट’ करतो, म्हणजे चावतो पण विष सोडत नाही. त्यामुळे पीडित व्यक्तीचा मृत्यू होत नाही

नाग दंशांपैकी २० ते ३० टक्के प्रकरणे ही ‘ड्राय बाईट’ असतात, नागाचे दात शरीरात खुपसतात, जखमेच्या खुणा, वेदना किंवा सूज दिसू शकते, पण विष शरीरात जात नाही

नाग आपल्या आयुष्यात ४ ते ५ वेळा ड्राय बाईट करू शकतो. हे प्रामुख्याने इशारा देण्यासाठी केलेले चावे असतात

नाग आपल्या विषाचा वापर नियंत्रित करतो, ज्याला व्हेनम मीटरिंग म्हणतात

विष डोक्याजवळील ग्रंथींमध्ये तयार होते व सोडल्यानंतर पुन्हा तयार होण्यासाठी साधारण ६ ते ७ दिवस लागतात. या काळात चावल्यानंतर विष बाहेर पडत नाही

कधी कधी चावतानाही योग्य पद्धतीने विष सोडले जात नाही, त्यामुळे ड्राय बाईट होतो

तरीही अशा दंशाला हलके घेऊ नये, कारण संसर्ग किंवा इतर गुंतागुंती होऊ शकतात

सापाचे वयही महत्त्वाचे असते. लहान साप जास्त प्रमाणात विष सोडतात, तर प्रौढ साप तुलनेने कमी विष सोडतात

ड्राय बाईट जीवघेणा नसला तरी वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक असते, जेणेकरून संसर्ग किंवा इतर गुंतागुंत टाळता येईल

येथे क्लिक करा