Heart Attack : खराब Oran Hygiene देखील देऊ शकतो हार्ट अटॅक; अभ्यासात झालं स्पष्ट

Anirudha Sankpal

फिनलंड आणि यूकेतील संशोधकांनी 121 मृत रुग्णांच्या कोरोनरी प्लाक्स आणि 96 शस्त्रक्रियेतील धमनी नमुन्यांचे विश्लेषण केले.

या विश्लेषणात जवळपास निम्म्या प्रकरणांत जीवाणूंचे डीएनए आढळले. हे जीवाणू कोरोनरी प्लाक्समध्ये 42% आणि शस्त्रक्रियेतील नमुन्यात 43% आढळले.

त्यात दात आणि हिरड्यांच्या संक्रमणासाठी ओळखले जाणारे व्हिरीडन्स स्ट्रेप्टोकोक्कास सर्वात जास्त प्रमाणात आढळले.

हे जीवाणू धमन्यांमध्ये बायोफिल्म तयार करतात, जी शरीराच्या प्रतिकारशक्तीपासून लपून राहते.

जेव्हा प्लाक फाटतो, तेव्हा त्यातील जीवाणूंचे तुकडे बाहेर पडतात आणि तीव्र सूज निर्माण होते.

ही सूज धमनींच्या झडपा कमकूवत करते. यामुळं धमन्या अचानक फुटण्याचा धोका निर्माण होतो. त्यातून हृदयविकाराचा झटका येतो.

प्रयोगशाळा चाचणीने सिद्ध केले की हे जीवाणू TLR2 नावाच्या संकेत मार्गाला सक्रिय करतात, ज्यामुळे धमन्यांमध्ये दाह वाढतो.

या संशोधनामुळे हृदयविकाराच्या मूळ कारणांविषयी नवी दिशा मिळाली असून मौखिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

भविष्यात अशा संशोधनातून अँटीबायोटिक्सचा वापर, बायोफिल्म्स शोधण्यासाठी नवी तंत्रे किंवा त्यांना रोखण्यासाठी औषधे विकसित होण्याची शक्यता आहे.

येथे क्लिक करा