Mental Peace: अशांत मन शांत करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी दिलाय प्रभावी मंत्र

Anirudha Sankpal

नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना । न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम्।।

आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव हा 'सायलेंट किलर' बनला असून, अशांत मन कधीही योग्य निर्णय घेऊ शकत नाही.

भगवद्गीतेनुसार, ज्याचे मन नियंत्रणात नाही त्याला खरी बुद्धी आणि एकाग्रता लाभत नाही, परिणामी त्याला शांती आणि सुख मिळत नाही.

सततची चिंता आणि तणाव केवळ मानसिकच नव्हे, तर निद्रानाश आणि शारीरिक थकवा यांसारख्या आजारांनाही निमंत्रण देतात.

भूतकाळातील पश्चात्ताप आणि भविष्याची भीती सोडून 'वर्तमानात' जगणे हाच तणावापासून दूर राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

बाह्य परिस्थिती आपल्या हातात नसली तरी, आपले आंतरिक संतुलन राखणे आपल्याच हातात आहे, हे नेहमी लक्षात ठेवा.

जे आपल्या नियंत्रणात नाही, ते ईश्वरावर सोडून परिस्थितीचा स्वीकार करायला शिकल्यास अर्धा तणाव लगेच दूर होतो.

दिवसातून किमान १० मिनिटे 'मौन' पाळणे आणि दीर्घ श्वास घेण्याचा सराव केल्याने मेंदू पुन्हा रिचार्ज होऊन शांत होतो. शांती ही बाहेर कुठेही नसून ती तुमच्या आतच आहे; तो एक 'पर्याय' आहे.

"मी केवळ माझे कर्म करू शकतो, फळ माझ्या हातात नाही," हा भाव अंगीकारल्याने मनावरचा अनावश्यक भार हलका होतो.

येथे क्लिक करा