दुधी भोपळा केवळ चविष्टच नाही, तर आरोग्याचा खजिना आहे. .यात फायबर, व्हिटॅमिन C, B6, फोलेट, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते..दुधी भोपळ्याचा रस हा उत्तम Natural Energy Drink मानला जातो. यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते..कमी कॅलरीज आणि जास्त फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते..पचनक्रिया सुधारण्यासाठी त्याचा रस म्हणजे 'वरदान' आहे. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो..यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करते आणि कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवून हृदयविकाराचा धोका कमी करते. .अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा हायड्रेट राहते. नियमित सेवनाने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात आणि नैसर्गिक चमक येते..दुधी भोपळ्यामध्ये ९२% पाणी असते. उन्हाळ्यात याचा रस प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि तापमान संतुलित राहते..दुधी भोपळ्याचा रस तणाव कमी करण्यास आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतो..भाजी, ज्यूस, कोफ्ता, खीर किंवा हलवा अशा विविध स्वरूपात तुम्ही दुधी भोपळ्याचा आहारात समावेश करू शकता!