stress relief tips | तणावमुक्त राहायचंय? नैसर्गिकरित्या 'फील गुड' हार्मोन्स वाढवणारे सोपे ७ उपाय

पुढारी वृत्तसेवा

संशोधनानुसार, किमान २०-३० मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम केल्याने मेंदूत एन्डॉर्फिन्सची निर्मिती वेगाने होते, याला 'रनर्स हाय' असेही म्हणतात.

डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात जे मेंदूला उत्तेजित करून आनंद देणाऱ्या हार्मोन्सचे प्रमाण वाढवतात. मर्यादित प्रमाणात याचे सेवन फायदेशीर ठरते.

'हसणे हे सर्वोत्तम औषध आहे' हे विज्ञानानेही मानले आहे. मोठ्याने हसल्यामुळे शरीरातील स्नायूंचा ताण कमी होतो आणि तत्काळ एन्डॉर्फिन्स रिलिझ होतात.

लॅव्हेंडर किंवा व्हॅनिला सारख्या सुगंधांचा वास घेतल्याने मेंदूतील तणाव कमी होतो आणि मानसिक शांतता मिळते, ज्यामुळे आनंदी हार्मोन्स वाढतात.

संशोधनानुसार, जिभेला तिखटपणाची जाणीव झाल्यावर मेंदू त्या 'जळजळीला' वेदना समजून तिला शमवण्यासाठी एन्डॉर्फिन्स बाहेर सोडतो.

संगीत ऐकल्याने किंवा वाद्य वाजवल्याने मेंदूमध्ये डोपामाइन आणि एन्डॉर्फिन्सचे प्रमाण वाढते, ज्यामुळे मूड लगेच सुधारतो.

दररोज ७-८ तासांची झोप आणि १० मिनिटे ध्यान केल्याने शरीरातील कोर्टिसोल कमी होऊन आनंदी हार्मोन्स संतुलित राहतात.

हे छोटे बदल तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडवू शकतात!

येथे क्‍लिक करा.