Alcohol Facts |"दारूचे दुष्परिणाम कमी करायचेत? तज्ज्ञांच्या या ४ सोप्‍या टिप्स फॉलो करा

पुढारी वृत्तसेवा

आठवड्याचा शेवट अनेकांचे पार्ट्यांचे प्लॅन्स तयार असतात. बऱ्याचदा या पार्ट्या मद्याशिवाय अपूर्ण मानल्या जातात.

तुम्ही सोशल ड्रिंकर असाल, तर काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही होणारे नुकसान नक्कीच कमी करू शकता. हे कसे शक्य आहे?

गुरुग्राम येथील कन्सल्टंट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट (कर्करोग तज्ज्ञ) डॉ. वर्तिका विश्वाणी यांनी एका व्हिडिओमध्ये मद्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी टिप्स शेअर केल्या आहेत.

डॉ. वर्तिका म्हणतात, "एक कॅन्सर तज्ज्ञ म्हणून मी तुम्हाला मद्यपान करू नका असे सांगितले तर कदाचित तुम्ही ऐकणार नाही, पण किमान या चुका करणे टाळा."

डॉ. वर्तिका यांच्या मते, अत्यंत कमी वेळात (उदा. एक-दोन तासात) मोठ्या प्रमाणात मद्यपान करणे टाळा.

अति दारु पिल्‍याने यकृतामध्ये 'ॲसेटाल्डिहाइड' नावाचे विषारी द्रव्य तयार होते. यामुळे हँगओव्हर, डोकेदुखी, उलट्या, घाम येणे, चक्कर येणे आणि हृदयाचे ठोके वाढणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

मद्य आणि धूम्रपान एकत्र केल्‍यास त्याचे दुष्परिणाम कैक पटीने वाढतात. आरोग्याला २१ पटीने धोका वाढू शकतो. त्यामुळे मद्यपान करताना धूम्रपान पूर्णपणे टाळा.

रिकाम्या पोटी मद्यपान करु नका. त्‍यामुळे तुमचे शरीर अल्कोहोल वेगाने शोषून घेते, अवयवांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक वाढते."

वेगवेगळी ड्रिंक्स एकत्र (Mix) करू नका. तुम्ही दोन-तीन प्रकारचे मद्य एकत्र घेता, तेव्हा 'ॲसेटाल्डिहाइड'चे प्रमाण वाढते. हे विषारी द्रव्य हँगओव्हरबरोबरच भविष्यात गंभीर आजारांनाही निमंत्रण देते.

येथे क्‍लिक करा.