Strength Training Benefits : दीर्घायुष्याचं गुपित! आठवड्यातून फक्त २ दिवस करा 'हा' खास व्यायाम!

पुढारी वृत्तसेवा

अनेक जण फक्त रनिंग, सायकलिंग किंवा चालण्‍याचा व्‍यायाम करतात. पण तज्ज्ञांच्या मते, दीर्घायुष्यासाठी यासोबत स्नायू मजबूत करणेही तितकेच गरजेचे आहे.

संशोधनानुसार, कोणताही व्यायाम न करणार्‍यांनी स्ट्रेंथ ट्रेनिंगची छोटी सुरुवात केली तरी आरोग्याला सर्वात मोठे फायदे मिळतात.

सुरुवातीला दर आठवड्याला २० ते ३० मिनिटांची केवळ २ सत्रे करा. प्रत्येक व्यायामाचे २ ते ३ सेट (Set) मारण्याचा प्रयत्न करा.

स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी तुम्ही घरातच सोफा, खुर्ची किंवा पाण्याच्या बाटल्यांचा वापर करून व्यायाम करू शकता.

लोअर बॉडीसाठी खुर्चीवर उठ-बस (Squats) करा, वरच्या भागासाठी वॉल पुश-अप्स आणि पोटासाठी 'प्ँक्स' (Planks) करा.

तुम्ही जिममध्ये जात असाल, तर संपूर्ण शरीराला टार्गेट करणाऱ्या बार्बेल स्क्वॉट्स, बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट्स या ३ मोठ्या व्यायामांवर भर द्या.

व्यायाम खूप सोपा वाटल्यास वजन किंवा फेऱ्या वाढवा. पण शरीरावर अतिताण देऊ नका.

संशोधनानुसार, आठवड्यातून ३० ते ६० मिनिटे स्नायूंचे व्यायाम केल्यास हृदयविकार, मधुमेह, कर्करोग आणि अकाली मृत्यूचा धोका १० ते १७ टक्क्यांनी कमी होतो.

संशोधनानुसार, वयाच्या ७० शी नंतरही वेट ट्रेनिंग केल्यास शरीराची कार्यक्षमता सुधारते आणि स्नायूंचे प्रमाण टिकून राहते.

आजचे स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे भविष्यात निरोगी राहण्‍यासाठी गुंतवणूक आहे हे लक्षात ठवा.

येथे क्‍लिक करा.