Health Benefits Of Cloves : स्वयंपाकघरातील चिमूटभर लवंग ठरेल वरदान; जाणून घ्या फायदे!

पुढारी वृत्तसेवा

स्वयंपाकाची चव वाढवण्यासोबतच लवंग आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते.

उग्र वास, तिखट चव आणि दाबल्यावर बोटाला तेल लागणारी काळी लवंग उत्तम प्रतीची असते.

फोडणीत किंवा भातामध्ये लवंग घातल्याने जेवण रुचकर, स्वादिष्ट आणि सुवासिक बनते.

लवंगाच्या तेलात कापसाचा बोळा भिजवून दाताखाली धरल्याने दातदुखी थांबते.

प्रवासात उलटी आल्यास तोंडात लवंग ठेवून रस चघळल्याने आराम मिळतो.

लवंग भाजून तोंडात ठेवल्याने घशाची सूज, खोकला आणि सर्दीमध्ये मोठा फायदा होतो.

लवंगा पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्याने किंवा तेलात साखर मिसळून घेतल्याने सर्दी बरी होते.

लवंग पाण्यात घासून कपाळावर कोमट लेप लावल्याने किंवा लवंगाचे तेल चोळल्याने डोकेदुखी थांबण्‍यास मदत होते.

आयुर्वेदानुसार लवंग पाचक आणि अग्निप्रदीपक असून, अपचन व पोट फुगण्याच्या समस्येवर गुणकारी आहे.

अतिवापर टाळा! लवंगेचे तेल जंतुनाशक असले, तरी याचे अतिसेवन केल्याने डोळे आणि मूत्राशयावर वाईट परिणाम होऊ शकतो.

येथे क्‍लिक करा.