Time Management Trick : आळसामुळे तुम्‍ही कामे टाळाटाळ करतायं? जाणून घ्या 'दोन मिनिटांचा नियम'

पुढारी वृत्तसेवा

तुम्हाला काम पुढे ढकलण्याची सवय थांबवायची असेल तर '2-मिनिटांचा नियम' नक्की जाणून घ्या.

Canva

दोन मिनिटांसाठी प्रत्येक लहान कामावर लक्ष केंद्रित करता येते. ही पद्धत वापर तुम्ही कामांची यादीतील अनेक गोष्टी पूर्ण करू शकता.

Canva

लहान कामे करताना मानसिक थकवा येतोच. कामातील दिरंगाई टाळण्‍यासाठी ‘2-मिनिटांचा नियम’ खूप प्रभावी ठरतो.

Canva

डेव्हिड ॲलन यांचे पुस्तक ‘गेटिंग थिंग्स डन’मधून हा नियम  वाचकांसमोर आला.

Canva

हा नियम सांगतो की, एखादे काम 2 मिनिटांत किंवा त्यापेक्षा कमी वेळेत पूर्ण करता येत असेल तर ते त्याच क्षणी करा.

Canva

उदा. कामाच्या ईमेलला उत्तर देणे, रात्रीच दुसर्‍या दिवशीच्‍या कामाची तयारी.

Canva

घरातील कुंडांना पाणी देणे, सहकाऱ्याला किंवा मित्राला धन्यवाद पत्र, रात्रीच दुसर्‍या दिवशीच्‍या कामाची तयारी आदी कामातही या नियमाचा मोठा उपयोग होतो.

Canva

या नियमाचे पालन केल्‍यास तुम्हाला सतत काम करण्याची सवय लागेल. कार्यालयीन कामकाजात हा नियम उपयुक्त ठरतो.

Canva

तुमची शिस्त वाढते. एका कामासाठी फक्त 2 मिनिटे देणे सोपे नाही; पण असे केल्याने आत्म-नियंत्रण वाढण्‍यास मदत हाेते.

Canva

स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या संशोधनानुसार, मल्टिटास्किंग करणारे लोक इतरांपेक्षा लवकर थकतात. म्हणूनच, दोन मिनिट छोटे काम पूर्ण लक्ष देऊन करा. त्‍यानंतर पुढील काम सुरू करा.

Canva
येथे क्‍लिक करा.