ऑफिसमध्ये 'या' गोष्टी चुकूनही सांगू नका! नाहीतर तर अडचणीत याल

पुढारी वृत्तसेवा

ऑफिसमध्ये ओव्हरशेअरिंग टाळा

ऑफिसमध्ये आपण दररोज अनेक तास घालवतो. त्यामुळे सहकाऱ्यांसोबत चांगली मैत्रीही होते.
पण प्रत्येक गोष्ट शेअर करणे योग्य नसते. काही खासगी गोष्टी स्वतःपुरत्याच ठेवणं चांगलं.

वैयक्तिक समस्या सांगू नका

ऑफिसमध्ये प्रत्येकाला तुमच्या वैयक्तिक समस्या सांगू नका. घरातील भांडणं, कर्ज किंवा आर्थिक अडचणी शेअर करणे टाळा. नातेसंबंध आणि प्रेमप्रकरणांबद्दलही जास्त बोलू नका.
या गोष्टींचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.

आर्थिक परिस्थिती गुप्त ठेवा

तुमची आर्थिक परिस्थिती ही वैयक्तिक बाब आहे. तुमच्यावर किती कर्ज आहे, हे सर्वांना सांगण्याची गरज नाही. आर्थिक अडचणी सांगितल्याने तुमच्याबद्दल चुकीची प्रतिमा तयार होऊ शकते. म्हणून अशा गोष्टी खासगी ठेवा.

करिअरचे प्लॅन सांगू नका

तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत आहात का? कुठे इंटरव्ह्यू दिला आहे का?
नवीन कंपनीत सिलेक्शन होण्याची शक्यता आहे का? अशा गोष्टी प्रत्येक सहकाऱ्याला सांगू नका.

तुमचे गोल्सही खासगी ठेवा

करिअरमध्ये पुढे काय करायचे आहे, हे सगळ्यांना सांगणे गरजेचे नाही. तुमचे मोठे प्लॅन्स आधीच शेअर केल्याने अडचण होऊ शकते. काही लोक तुमच्या प्लॅन्सचा गैरफायदा घेऊ शकतात. योग्य वेळ येईपर्यंत तुमचे गोल्स स्वतःपुरते ठेवा.

कामाचे शॉर्टकट सांगू नका

तुम्ही काम लवकर आणि स्मार्ट पद्धतीने कसे करता, हे प्रत्येकाला सांगू नका. काही शॉर्टकट तुमच्या कामाचा खास भाग असू शकतात. ते चुकीच्या पद्धतीने वापरले जाऊ शकतात.
त्यामुळे ऑफिसमध्ये तुमची प्रतिमाही खराब होऊ शकते.

घराचा अचूक पत्ता देऊ नका

सहकाऱ्यांना तुम्ही कोणत्या भागात राहता, एवढे माहित असणे पुरेसे आहे. घराचा अचूक पत्ता किंवा लोकेशन शेअर करू नका. विशेषतः नवीन कलीग्ससोबत अशी माहिती देताना काळजी घ्या. ऑनलाइनही घराचे लोकेशन सार्वजनिक करणे टाळा.

तुमची सॅलरी सांगू नका

तुमची सॅलरी किती आहे, हे प्रत्येक सांगण्याची गरज नाही. इन्सेंटिव्ह किंवा बोनसची अचूक रक्कमही शेअर करू नका. यामुळे ऑफिसमध्ये तुलना आणि गैरसमज निर्माण होऊ शकतात.
पगाराशी संबंधित माहिती शक्यतो खासगी ठेवा.

आरोग्य आणि नात्यांबद्दल जपून बोला

गंभीर आरोग्याच्या समस्या सर्वांसोबत शेअर करू नका. तुमच्या रिलेशनशिपमधील अडचणीही ऑफिसमध्ये चर्चेचा विषय बनवू नका. अशा गोष्टी पुढे तुमच्याविरोधात वापरल्या जाऊ शकतात.
विश्वासू व्यक्तीसोबतच अशा गोष्टी शेअर करा.

ऑफिसमध्ये मैत्री करा, पण मर्यादा ठेवा

सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध असणे महत्त्वाचे आहे. पण मैत्री आणि खासगी आयुष्य यामध्ये सीमारेषा असावी. प्रत्येक गोष्ट सांगणे म्हणजे विश्वास ठेवणे नाही. ऑफिसमध्ये प्रोफेशनल राहा आणि तुमची खासगी माहिती सुरक्षित ठेवा.

१ वर्षाच्या बाळाला खेळता-खेळता शिकवा 'या' ८ गोष्टी

येथे क्लिक करा