Namdev Gharal
अनेकांना पोटात अतिप्रमाणात गॅस होण्याची समस्या असते, बरेच औषध घेऊनही कमी होत नाही यासाठी काही टीप्स फोलो करा नक्की फरक जाणवेल
जेवण करताना मोठा ‘आ’ करुन खाणे बंद करा लहान घास घ्या मोठा आ केल्याने वायू शरिरात शिरतो, परिणामी गॅस तयार होतो
जेवताना मध्ये मध्ये अगदी घोट घोट कोमट पाणी प्या अन्न नीट पचेल
पोटफूगी जाणवत असेल तर रात्री झोपताना चिमूटभर सुंठ, एक चमचा तूप व कोमट पाणी घ्या फरक जाणवेल
चावून चावून सावकाश घास खाणे, भराभरा खाल्ले तर गॅस तयार होण्याची शक्यता जास्त. जठराग्नीचे हळू हळू खाल्यावर शमन होते,
पटापट जेवल्याने अपचनाची समस्या वाढते त्यामुळे पोटात गॅस तयार होतो
पाणी पिताना एकाचवेळी घटा घटा पिऊ नये ते हळू हळू घोट घोट पाणी घ्या यानेही फरक पडेल
पोटाला तिळ तेलाने मसाज करणे हे खूपच फायदेशीर ठरते वारंवार होणार गॅसचा त्रास बंद होतो
नाभीमध्ये एरंडेल तेलाचे दोन थेंब घाला व जेवल्यानंतर बडिशेप आर्वजून खा, या छोट्या उपयांनी तुमचा गॅसचा त्रास खूपच कमी होईल