Stoat : ‘हिप्नोटाईज’ करुन शिकार करणारा प्राणी

Namdev Gharal

stoat स्‍टोट हा खार व उंदीर यासारखा दिसणारा प्राणी असून याचे शरीर लांबूटके असते ,

याचे वैशिष्‍टय म्‍हणजे आपल्‍यापेक्षा मोठ्या असणार्‍या सशाची हा शिकार करतो

यासाठी तो शिकारीला हिप्नोटाईज करतो, एखादा ससा दिसला की हा वेडावाकडा डान्स करतो, उलट्या उड्या मारतो, अनपेक्षित हरकती करतो

हे पाहून ससा गोंधळून जातो, त्‍याच्या लक्षात येत नाही हा प्राणी असा का वागत आहे. स्‍टोट हा अशाप्रकारे सशाच्या जवळ जातो व अचानक झडप घालून त्‍याची शिकार करतो

सशाबरोबरच उंदीर, खारी, पक्षी, कीटक आणि कधी कधी मासे यांचीही शिकार करतो. विझेल (Weasel) कुलातील हा प्राणी आहे

साधारण 17–33 सें.मी याची लांबी असते व वजन 150 ते 450 ग्रॅम इतके असते

उन्हाळ्यात याचा पाठीवरील भाग तपकिरी व पोटाचा भाग पांढरा असतो; थंड प्रदेशात हिवाळ्यात याचे केस पांढरे होतात यामुळे बर्फात सहज लपून जातो

युरोप, आशिया, आणि उत्तर अमेरिकेच्या थंड हवामानातील प्रदेशात याचा प्रामुख्याने आढळ असतो.

लक्‍झरी फॅशन ब्रँडमध्ये याच्या पांढऱ्या ermine fur चा उपयोग वस्त्रे तयार करण्यासाठी केला जात असे.

Frog Farming